प्रसिद्दी साठी वृत्त

युरोप देशांच्या कृषी पर्यटन अभ्यास दौऱ्या साठी भारतीय शिष्ट मंडळ रवाना

युनाइटेड नेशन्स वर्ल्ड टुरिझम ऑर्गनाजेशन ( UNWTO) यांनी जाहीर केलेल्या ‘ शाश्वत पर्यटन विकास वर्ष २०१७’ तसेच ‘ विझिट महाराष्ट्र वर्ष २०१७’ निम्मित, 

महाराष्ट्र तसेच पंजाब, आसाम, दिल्ली, तामिळनाडू, गुजरात या राज्यातील कृषी पर्यटन केंद्र चालक, अध्यापक, शासकीय अधिकारी यांच्या युरोप देशांतील कृषी पर्यटन अभ्यास दौरा दिनांक १ नोव्हेंबर पासून सुरु होत असून त्याचे नेतृत्व श्री पांडुरंग तावरे करीत आहेतण् शिष्टमंडळ ऑस्ट्रिया, स्विझर्लंड आणि इटली या तीन देशांचा कृषी पर्यटन संकल्पनेचा अभ्यास करणार असून येथील कृषी पर्यटन केंद्रांना आणि प्रत्येक्ष शेतकरी कुटुंबाना भेटणार आहेत, या देशातील कृषी विभाग,  पर्यटन विभाग तसेच त्यांच्या सरकार ने कृषी पर्यटनासाठी घेतलेले धोरण यांचा अभ्यास करणार आहेत तसेच कृषी विद्यापीठे, पर्यटन क्षेत्रात काम करीत असलेल्या संस्थांना सुद्धा भेट देणार आहेत.

या दौऱ्या दरम्यान इटली येथे होत जागतिक कृषी पर्यटन काँग्रेस या परिषेदेत भारतीय शिष्टमंडळ सहभागी होणार असून ए दिनांक ८ नोव्हेंबर रोजी या परिषदेत श्री पांडुरंग तावरे मूळ भाषण ; किनोट स्पीच द्धकरणार आहेत ए त्यांचा विषय आहे . भारतातील कृषी पर्यटन सध्य स्थिती, आव्हाने आणि धोरणे.
इटली देश कृषी पर्यटन संकल्पनेचे महेर घर समजला जातो, इटली मधल्या ज्या जिल्ह्यात हि जागतिक कृषी पर्यटन परिषद होत आहे त्या एका जिल्ह्यात २६०० कृषी पर्यटन केंद्र कार्यरत आहेत, मूळ संकल्पना अशी कि, भारतातील कृषी पर्यटन केंद्र चालक ए शासन ए यांना कृषी पर्यटनाचे सखोल ज्ञान ए जगभर या श्रेत्रात सुरु असलेल्या घडामोडी, इतर देशांची कृषी पर्यटनाची धोरणे यांची माहिती व्हावी या साठी कृषी पर्यटन विकास संस्थेच्या पुढाकारातून २०१७ पासून परदेश कृषी पर्यटन अभ्यास दौरे सुरु केले, २०१७ मध्ये फिलिपिन्स, सिंगापुर, आणि मलेशिया या तीन देशांचा दौरा केला होताण्

कृषी पर्यटनाच्या मध्यमातुन ग्रामीण भागातील शेतकरी कटुंबाच्या विकासाला चालना:
महाराष्ट्रातील कृषी पर्यटन क्षेत्राची सध्य स्थिती
महाराष्ट्रात ५२८ कृषी पर्यटन सुरु आहेत, मागील ३ वर्षात या कृषी पर्यटन केंद्रांना २० लाखा पेक्ष्या जास्त पर्यटकांनी भेटी दिल्या असून त्याद्वारे या कृषी पर्यटन केंद्रांना ४७ कोटी रुपये एवढे आर्थिक उत्पन्न मिळाले आहे ण्

कृषी पर्यटनाचे दूरगामी फायदे

  • ग्रामीण कृषी संस्कृतीचे जतन व संवर्धन
  • ग्रामीण भागातील पर्यावरणाचे जतन व संवर्धन
  • ग्रामीण गावरान बी बियाणे यांचे जतन व संवर्धन
  • शेतावरच शेतकरी आपला शेती माल, विक्री करू शकला आणि कुटुंबाला रोजगार उपलब्ध झाला
  • ग्रामीण भागातील युवक ए महिला बचत गटातील सदस्य यांच्या निवडक मालाला बाजार पेठ मिळाली
  • जल संधारण, जमीन संधारण ए असे बरेच उपयोग कृषी पर्यटनातून होत आहेत

या विदेश कृषी पर्यटन अभ्यास दौऱ्यांचा लाभ महाराष्ट्रातील बऱ्याच शेतकरी कुटुंबाला व्हवा या उद्देश आहे

कृषी पर्यटन: कृषी पर्यटन म्हणजे कृषी व पर्यटन या दोन सांस्कृतिचा मिलाप असून, कृषी पर्यटनाच्या माध्यमातून शहरातील पर्यटक गावाकडील शेतांना भेटी देतात, शेतीच्या विविध पैलूंचे जवळून दर्शन घेतात एताजा भाजीपाला, रास्त किमतीत खरेदी करतात, ग्रामीण भोजन, ग्रामीण कलाकुसर, तसेच लोककला आणि पारंपरिक कलेचा अस्वाद घेतातण् असे ठिकाण म्हणजेच कृषी पर्यटन केंद्र होय

अधिक माहिती साठी संपर्क
श्री पांडुरंग तावरे
९८२२० ९०००५