कृषी व ग्रामीण पर्यटन समृद्ध शेतीचा राजमार्ग

photo16

कृषी पर्यटन म्हणजे “कृषी व पर्यटन” या दोन विभागाचा समन्व्य आहे. जेथे पर्यटक शेतांना भेट देतील , शेतीच्या विविध पैलूंचे दर्शन व अनुभव घेतील, ताजा भाजीपाला , फळे, खरेदी करू शकतील प्रदूषण मुक्त वातावरणाचा आनंद घेऊ शकतील, ग्रामीण भारतीय भोजनाचा तसेच जागरण, गोंधळ, भारूड, कीर्तन, प्रवचन, अशा पारंपरिक लोक कलांचा अनुभव व आनंद घेऊ शकतील. पुन्हा ताजे तवाने होऊन आपल्या शहराकडे जाऊ शकतील. शहरी व ग्रामीण या मध्ये असलेली दारी कमी होईल. ग्रामीण भागातील माणूस शहराशी जोडला जाईल. शहरातील मुलांना गावाकडे आपल्या मामाचे घर मिळेल. शहरातील पैसा ग्रामीण भागात विखुरला जाईल व आपले गाव निश्चित स्वयंपूर्ण होईल. या साठी कृषी पर्यंटन विकास संस्था १३ वर्षांपासून काम करत असून महाराष्ट्र राज्यात ३५० पेक्षा जास्त कृषी व ग्रामीण पर्यटन केंद्र संस्थेच्या माध्यमातून शेतकऱयांच्या शेतावर सुरु केली आहेत. कृषी पर्यटन केंद्रांची संख्या मोठ्या प्रमामाणावर वाढत असून पर्यटकांचा मोठा कल कृषी व ग्रामीण पर्यटनाकडे आहे. सन २०१५-२०१६ या एक वर्षात जवळपास २३ लाख पर्यटकांनी कृषी व ग्रामीण पर्यटनाला भेटी दिल्या असून ३५.७९ कोटी रुपयाची उलाढाल एका वर्षात झाली आहे. याचा अर्थ कृषी व ग्रामीण पर्यटनाला मोठा वाव व संधी आहे.

कृषी पर्यटन विकास संस्था कोणते सहाय्य देईल :-

१)आपल्या शेतीला कृषी पर्यटन केंद्र चालू करण्यासाठी सखोल मार्गदर्शन करेल.
२) कृषी व ग्रामीण पर्यटन सुविधा तसेच निवास व्यवस्था , रस्ते व पायाभूत सुविधा उभारण्यासाठी
राष्ट्रीयकृत बँका, संस्था तसेच शासकीय संस्था द्वारे आर्थिक सहाय्यासाठी मदत व मार्गदर्शन.
३) कृषी व ग्रामीण पर्यटन व्यवसाय प्रशिक्षण कार्यक्रम.
४) विक्री, विपणन व व्यवसाय वृद्धी साठी मार्गदर्शन
५) शहरी भागातून आपल्या कृषी पर्यटन केंद्रावर सहलींचे आयोजन.
६) उत्कृष्ठ कृषी पर्यटन केंद्र चालकांचा ” जागतिक कृषी पर्यटन गौरव पुरस्कार” देऊन गौरव.
७) राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय कृषी पर्यटन केंद्रांचे अभ्यास दौरे / भेटींचे आयोजन.
८) सोशल मीडियाच्या माध्यमातून वेळोवेळी कृषी पर्यटन विषयक माहिती आपल्या पर्यंत पोचविणे.
९) कृषी पर्यटन कर्ज योजनेसाठी प्रोजेक्ट रिपोर्ट तयार करणे.

भारतात कृषी पर्यटन सुरु करणारे महाराष्ट्र हे पहिले राज्य आहे , आज मितीस ४०० पेक्षा जास्त कृषी पर्यटन केंद्र अस्तित्वात असून मागच्या आर्थिक वर्षात २०१५-१६ या कृषी पर्यटन केंद्रांना ८ लाख पर्यटकांनी भेटी दिल्या असून रुपये १८ कोटी चे अतिरिक्त उत्पन्न कृषी पर्यटन केंद्र चालकांना मिळाले आहे , ५००० लोकांना या माध्यमातून रोजगार मिळाला आहे , गावातील महिला बचत गट , युवक , कारागीर , कलाकार , या सर्वांना कृषी पर्यटनाला येणाऱ्या पर्यटकांमुळे फायदा झाला आहे , त्यामुळे कृषी पर्यटन हे गावाला पूरक व्यवसायांचे जाळे निर्माण करणारा शेतीवर आधारित उपक्रम आहे ,जग भरातील देशांनी पर्यटन क्षेत्र खूप गांभीर्याने घेतले आहे , आशिया खंडातील कित्येक दक्षिण अग्न्य देशांची आर्थिक उलाढाल फक्त पर्यटनाच्या जोरावर सुरु आहे , त्या सर्व देशांचे पर्यटन धोरण खूप प्रोग्रेसिव्ह आहे ,आपल्या देशात महाराष्ट्र राज्य कृषी पर्यटन चळवळ सुरु करणारे पहिले राज्य आहे.

सन 2004 साली बारामतीपासून सुरु झालेली कृषी पर्यटनाची चळवळ आज राज्याच्या सीमा ओलांडून देशभर पसरली आहे. राज्यात आजिमितीस ४१८ कृषी पर्यटन केंद्र कार्यरत आहेत. 2015 साली केलेल्या पाहणी अहवालानुसार काही महत्वपूर्ण माहिती उपलब्ध झालेली आहे. त्यामध्ये महाराष्ट्रातील कृषी पर्यटन करणारे शेतकरी कुटुंबाच्या उत्पन्नात कृषी पर्यटनाच्या माध्यमातून 40 टक्के अधिक आर्थिक उत्पन्न मिळाले आहे. तसेच शेतावर आधारित अनेक रोजगाराच्या संधीही उपलब्ध झालेल्या असलचे आढळून आले आहे. कृषी पर्यटनाचे महत्व आणि गरज सर्वच स्तरावर घेतली आहे. महाराष्ट्रात कृषी पर्यटनामध्ये साधारणतः 69 टक्के कृषी पर्यटन चालक शेतकरी पदवीधर आहेत. 20 टक्के कृषी पर्यटन चालक जन्माने शेतकरी नसले तरीही व्यवहारिक ज्ञान खूप आहे. कृषी पर्यटन चालक शेतकरी उच्च पदवीधर असून 10 टक्के कृषी पर्यटन चालक शेतकरी सातवी पर्यंत शिकलेले आहेत. 58 टक्के कृषी पर्यटन केंद्रांना शाश्‍वत सिंचन सुविधा उपलब्ध आहेत. 30 टक्के कृषी पर्यटन केंद्राच्या जवळ गड किल्लेे आहेत. त्यातून इतिहासाची माहिती मिळते आहे. 75 टक्के कृषी पर्यटन केंद्रावर कौटुंबिक सहली येतात. तसेच 20 टक्के कृषी पर्यटन केंद्रावर शाळेच्या सहली येतात. 5 टक्के कृषी पर्यटन केंद्रावर सर्व सहली येतात. उदा. शाळा, कॉलेज सहली, कंपनी सहली, कौटुंबिक सहली इत्यादी. आज मितीस महाराष्ट्रातील ४१८ कृषी पर्यटन केंद्रांना मागीलवर्षी 7 लाख पर्यटकांनी भेटी दिल्या आहेत. त्यातून 18 कोटी रुपयांचे अतिरिक्त उत्पन्न शेतकरी बंधूना मिळाले आहे. शिकलेले युवक कृषी पर्यटन चांगल्या प्रकारे चालवू शकतात. विशेषतः जे कृषी पदवीधर होऊन या व्यवसायात येऊ इच्छितात. त्यांना सर्वाधिक संधी आहे. महाराष्ट्रील एकूण ४१८ कृषी पर्यटन केंद्रावर ९२७ खोल्या असून, २८ टक्के कृषी पर्यटन केंद्र फक्त दिवसभराची सहली करतात.

कृषी पर्यटनाच्या माध्यमातून नवयुवकांना रोजगाराच्या विविध संधी आणि फायदेही आहेत. त्यामध्ये शेती, शेतकरी आणि शिवार स्वछता राहते. कृषि संस्कृतीचे जतन व संवर्धन होते. ग्रामीण परिसरातील पर्यावरणनाचे जतन व सर्वधन होत आहे. ग्रामीण भागातील युवक, महिला तसेच महिला बचत गटातील महिलांनी बनवलेले पदार्थ यांना गावातच बाजारपेठ उपलब्ध होत आहे. नवीन पिढीतील युवकांना रोजगाराची मोठी संधी आपोआपच उपलब्ध होते. पारंपरिक शेतीबरोबरच पर्यटन केंद्र उभारून आर्थिक शाश्‍वत उत्पन्न मिळत आहे.

महाराष्ट्र राज्यात नवीन पर्यटन धोरण मे २०१६ ला अस्तित्वात आले असून , कृषी पर्यटनाला चालना देण्यासाठी म्हणाव्या तितक्या उपाययोजना केलेल्या दिसून येत नाहीत , कृषी पर्यटन केंद्राचे मार्केटिंग शासन स्तरावर होणे गरजेचे आहे , जगभरातील वेगवेगळ्या पर्यटन प्रदर्शनात कृषी पर्यटन केंद्र चालकांना मोफत टेबल स्पेस दिली पाहिजे . जागतिक कृषी पर्यटन दिन म्हणून 16 मे हा दिवस आंतरराष्ट्रीय पर्यटन महोत्सव पत्रिकेमध्ये समाविष्ट केला असून आज जगभर त्याची व्याप्ती वाढताना दिसत आहे. १६ मे हा जागतिक कृषी पर्यटन दिन , महाराष्ट्र पर्यटन विभागाने मोट्या प्रमाणात साजरा केला पाहिजे , उत्कृष्ट कृषी पर्यटन केंद्रांना पुरस्कार दिले पाहिजेत,

अधिक माहिती साठी

पांडुरंग तावरे
९८२२०९०००५

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *