फिलिपिन्स येथे ५ व्या आंतरराष्ट्रीय कृषी पर्यटन परिषेदेला महाराष्ट्रातील कृषी पर्यटन केंद्र चालक १५ शेतकरी बंधू भगिनींचा सहभाग

farm tourism conference

फिलिपिन्स पर्यटन मंत्रालय , फिलिपिन्स कृषी मंत्रालय आणि आंतरराष्ट्रीय शाश्वत पर्यटन विकास संस्था फिलिपिन्स यांनी संयुक्त रित्या हि कॉन्फरन्स आयोजित केली होती , ५ वी आंतरराष्ट्रीय फार्म टुरिझम कॉन्फरन्स दि २ , ३, आणि ४ ऑक्टो २०१७ दरम्यान संपन्न झाली , त्या कॉन्फरन्स मध्ये सहभाग घेण्यासाठी कृषी पर्यटन विकास संस्था बारामती ( ए टी डी सी ) यांच्या पुढाकाराने आंतरराष्ट्रीय कृषी पर्यटन परिषेदेला ,महाराष्ट्रातील कृषी पर्यटन केंद्र चालक १५ शेतकरी सहभागी झाले !!

२ ऑक्टो ला कॉन्फरन्स चे उदघाटन तेथील मंत्री , अधिकारी , कृषी पर्यटनाचे उपसचिव , आणि श्री भगवानराव तावरे यांच्या हस्ते ढोल वाजवून झाले , वेगवेगळ्या देशातून आलेल्या मान्यवरांचे प्रेझेंटेशन झाली , कृषी पर्यटन इतर देशात कशा पद्धीतीने राबवले जाते यांची खूप माहिती मिळाली. ३ ऑक्टो ला कृषी पर्यटनाचे मार्केटिंग , शेतावरच नियोजन , आलेल्या पाहुण्यांचे अधरतीत्या कसे करायचे याचे उत्तम उद्धाराहण मिळाले

भारताचे प्रतिनिधित्व कृषी पर्यटन विकास संस्थे चे श्री पांडुरंग तावरे यांनी केले , त्यांनी भारतातील कृषी पर्यटनाची वर्तमान स्थिती मांडत , भारतात कृषी पर्यटन कशा पद्धतीने रुजले असून शेतकरी कुटुंबाना कृषी पर्यटनाचा फायदा कसा होत आहे याचे उद्धाराहण देऊन स्पष्ट केले . भारतातील कृषी पर्यटन क्षेत्राच्या घडामोडी जगभरातील आलेल्या सर्व शेतकऱ्यांना दिल्या . महाराष्ट्रातील कराड येथील आपलं गाव कृषी पर्यटन केंद्राचे श्री काटकर , थेऊर येथील कल्पतरू बाग कृषी पर्यटन केंद्रचे प्रतीक कंद , बारामती येथील बारामती कृषी पर्यटन केंद्राचे श्री भगवानराव तावरे व सौ सिंधुताई तावरे , आमखेडा (वाशीम) येथील भूमी कृषी पर्यटन केंद्राचे श्री. अविनाश जोगदंड, वेरूळ येथील श्री. पुंडलीक वाघ. त्याच बरोबर श्री. प्रकाश पावडे, नेताजी खंडांगळे , श्री. रामचंद्र शेळके. श्री अरुण कुमार क्षिरसागर , सुख कृषी पर्यटन केंद्राचे श्री. सुनील खळदकर यांचा समावेश होता

फिलिपिन्स देशात सन २०१४ साली फार्म टुरिझम (कृषी पर्यटन) चा ऍक्ट पास झाला असून , कृषी पर्यटन करणाऱ्या शेतकरी बंधू भगिनींना खूप अनुदान दिले जाते. फार्म टुरिझम कॉन्फरन्स दरम्यान अनेक देशातील कृषी पर्यटन केंद्र चालक आले होते त्यांचे मोलाचे मार्गदर्शन मिळाले , फिलिपिन्स येथील इलॉइलो शहरा जवळच्या वेगवेगळ्या कृषी पर्यटन केंद्राना भेटी देण्याचा योग आला , त्यामध्ये गरिन फार्म्स , इपातरः फार्म्स या दोन कृषी पर्यटन केंद्रातील पाहणी खूप शिकण्यासारखी होती

गरिन फार्म्स येथे कृषी , अध्यात्म, आणि पर्यटन यांची खूप सुंदर सांगड घातली असून येसू क्रिस्थाचे खूप मोठे स्थान उभा केले आहे , कृषी मध्ये कुकुटपालन , भाजीपाला , शेळ्यामेंढ्या , मशी गायी यांचा गोठा आहे , डोंगरउतारची जागा असलेले हे कृषी पर्यटन केंद्र गरिन परिवारातील २ बहिणी चालवतात, एकंदर त्यांचे नियोजन खूप वाखान्या जोगे आहे , स्वछता टापटीपपणा , मुकामाच्या खोल्या अतिशय सुंदर सजवल्या आहेत

कृषी पर्यटन क्षेत्राचे विस्तारित नॉलेज मिळावे , जगभरातील कृषी पर्यटन करणाऱ्या शेतकऱ्यांशी सवांद साधता यावा म्हणजे महाराष्ट्रात अधिक जोमाने कृषि पर्यटन करता येईल या बद्दल जागतिक पातळीवर कृषी पर्यटन क्षेत्रातील घडामोडी जाणून घेण्यासाठी हे सर्व शेतकरी बंधू भागणीनी सहभागी झाले होते . २ ऑक्टो , राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची जयंती , फिलिपिन्स मध्ये छोटे खाणी कार्यक्रम आयोजित केला गेला तसेच सिंगापुर मलेशिया येथील कृषी पर्यटन केंद्रांना भेटी दिल्या . मलेशिया सरकारचे ९२७ हेक्टर वर पसरलेले मलेशिया ऍग्रीकल्चर पार्क सॅलँगोर हे महत्वाचे कृषी पर्यटन केंद्र पाहण्याचा योग आला, या पुढे अशा प्रकारचे आंतरराष्ट्रीय कृषी पर्यटनाचे अभ्यास दौरे आयोजित करून महाराष्ट्रातील कृषी पर्यटन केंद्र चालक शेतकरी बंधूंना लाभ मिळवून देण्याचा , कृषी पर्यटन विकास संस्था बारामती ( ए टी डी सी ) चे कार्यकारी संचालक आणि कृषी पर्यटन संकल्पने जनक श्री पांडुरंग तावरे यांचा मानस आहे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *