कृषिमित्र ऍग्री टुरिझम सेंटर, काटोल.
दिनेश शेषराव ठाकरे, काटोल.
रजिस्ट्रेशन नंबर:- ATDC/2018/1519/HO
नमस्कार,
कृषिमित्र ऍग्री टुरिझम सेंटर मधे गेल्या एक ते दीड वर्षा पासून विशेष आकर्षण म्हणून ३००० चंदन झाडाची लागवड केलेली आहे व या झाडाची लागवड बघण्या करिता महाराष्ट्र राज्यातील प्रत्येक जिल्ह्यातून शेतकरी बांधव येतात व दिवसभर सकाळी १० ते सायंकाळी ५ वाजता पर्यंत चंदन व आंतरपीक लागवडीचे नियोजन कसे करावयाचे याचे सखोल प्रशिक्षण घेतात. त्यातच पूर्ण टुरिझम मधे शिवार फेरी व वन भोजनाचा आनंद घेतात. टुरिझम मधे चंदन सोबतच विविध प्रकारच्या फळ झाडाची बाग सुध्दा आहे. जसे पेरू, चिकू, आंबा, चिंच, जांभूळ,नारळ, फणस, करवंद, व इतर. तसेच उच्च प्रतीच्या ३००० संत्रा झाडाची बाग आहे. राहायला उत्तम फार्म हाऊसेस, टुरिझमच्या चारही बाजूला रोड व रस्ते तसेच मोठे दोन शेततळे आहे.
एक नवीन संकल्पना म्हणून टुरिझम ला हायटेक ड्राय क्लीनिंग लाँड्री चा व्यवसाय सुध्दा आहे. जेणेकरून कोणताही टुरिस्ट टुरिझम ला भेट द्यायला २ दिवसा साठी आला तर तो आपले सगळे १५ दिवसाचे घरगुती कापड ( घालायचे कपडे, चादर, बेडशीट, ब्लँकेट, इत्यादी) घेऊन येईल व जातानी स्वच्छ धुवून घेऊन जाईल ही एक नवीन सेवा टुरिस्ट देता येईल हा आमचा संकल्प आहे. टुरिझम पासून ८ किमी अंतरावर सती अनुसया माता चे देखणे देवस्थान आहे तसेच पाहण्याजोगा जाम प्रकल्प आहे. व विशेष स्वच्छता व सुंदरता असलेले हिरवे शहर म्हणजे काटोल शहर जे स्वच्छतेच्या बाबतीत भारतात तिसऱ्या तर विदर्भात पहिल्या क्रमांकावर मान पटकविनारे शहर आहे. ह्या शहरात २ लाखापेक्षा ही जास्त झाडाची लागवड झाली आहे. विनंती हीच की आपण सुध्दा एकदा कृषिमित्र ऍग्री टुरिझम सेंटर ला अवश्य भेट द्यावी व खऱ्या निसर्गाचा आनंद घ्यावा.
धन्यवाद….
दिनेश ठाकरे
काटोल
मानकामे बंधु यांचे कृष्णाजी ऍग्रो टुरिझम मोहिली निकोप पोस्ट मानिवली तालुका कर्जत जिल्हा रायगड पिन 410101मोबाईल नंबर 7517519080 &9987060416 & 9763023490
कर्जत निसर्गाच्या कुशीत वसलेला एक टुमदार तालुका ! उल्हास, पेज आणि शिलार नद्यांची गुंफण आणि चारही बाजूंना सह्याद्रीचा वेढा म्हणजे जणू काही नैसर्गिक कुंपणच ! ह्याच सह्याद्रीत गडकिल्ले बांधले असून हजारो वर्षांपूर्वीच्या लेण्या इथेच कोरलेल्या आहेत. स्वातंत्र्याच्या लढ्यात असलेले हुतात्मा भाई कोतवाल ह्याच भूमीत जन्माला आले तर नाट्यक्षेत्रात नाव कमावलेले राम गणेश गडकरीसुद्धा इथलेच….
कर्जत तालुका म्हणजे निसर्गाची मनसोक्त उधळण, शून्य प्रदूषित हवा तर नितळ पाण्याच्या नद्यांचा सडा, सकाळी धुक्याच्या दुलईत प्रेमळ गारवा तर दिवसभर वाहणाऱ्या वाऱ्याच्या झुळूक इथे भल्याभल्यांना प्रेमात पाडतात आणि हा सर्वच अनुभव अगदी एकाच ठिकाणी घ्यायचा असेल तर सुंदर असे पर्यटननिवास म्हणजे कृष्णाजी कृषी पर्यटन केंद्र ! माथेरानच्या पायथ्याला झाडांच्या गच्च अशा वनराईत आणि सर्द अशा सावलीत निसर्गाला कोणताही धक्का न लावता, मानकामे बंधूंनी जी कलाकृती साकारली आहे ती म्हणजे कृष्णाजी कृषी पर्यटन केंद्र होय.
कर्जत तालुक्यात नेरळ जवळील मोहिली-निकोप नावाच्या गावात हे कृषी पर्यटन केंद्र आकाराला आला आहे. तालुक्यातील लोकांचा प्रमुख व्यवसाय शेती व गोड्या पाण्यातील मासेमारी होय पण आज शहराची हवा लागली आणि ह्या पारंपरिक व्यवसायाचे प्रमाण कमी होत गेले पण मानकामे बंधूंच्या कृष्णाजी पर्यटन केंद्राने हे जपले आहे. ह्या केंद्रात तुम्हांला मासेमारी करता येते. त्यासाठी खास इथे तलाव बांधला आहे. ह्यात मजा म्हणजे तुम्ही पकडलेले मासे तुम्हांला तिथेच शिजवून देण्याची सोय त्यांनी केलेली आहे. विविध झाडांच्या अनेक जाती आणि भाजीपाल्याचे पीक याचि डोळा पाहताना, जो निखळ आनंद आहे तो शहरी शब्दांत मांडता येणार नाही त्यासाठी तुम्हांला इथे यावेच लागेल. हे सर्व पाहता खास टेन्शन फ्री होण्यासाठी भव्य असा तरणतलाव (swimming pool) आपली वाट पाहत असतो. छोटा असा बांधीव धबधबा ह्या तरणतलावात अखंड पडत असतो तसेच लहान मुलांसाठी एक छोटा तरणतलाव असून त्याचा आनंद बच्चे कंपनी अगदी मनसोक्त घेऊ शकतात. एकदा का फ्रेश झालो की, तलावाच्या बाजूला विस्तीर्ण झाडांखाली पक्षांच्या आवाजात बॅटमिंटन, कॅरम आणि छोटे छोटे खेळ खेळू शकता तर कातरवेळी तलावाकाठी स्वप्न रंगवू शकता. धमाल आहे हो हे सर्वच….
कृष्णाजी कृषी पर्यटन केंद्रात तुम्ही शाकाहारी अथवा मांसाहारी दोन्ही घरगुती पदार्थांवर यथेच्छ ताव मारू शकता. ह्यात आपला दिवस कधी सरतो, ह्याचा पत्ताही आपल्याला लागत नाही. रात्रभर तलावाकाठी बसून चंद्राच्या व चांदण्यांच्या साक्षीने गप्पाही रंगवता येतात तर शेकोटीभोवती फेरही धरता येतो. राहण्याची उत्तम सेवा असून तिथेच आपली रात्र सरते आणि सकाळी फ्रेश होऊन आपण परतीचा प्रवास सुरू करू शकतो. काही जणांना राहायचे नसल्यास एक दिवसाचे पॅकेजसुद्धा उपलब्ध आहेत मग वाट कसली पाहताय आपल्या कुटुंबाला, मित्रमैत्रिणींना आणि नातेवाईकांना नक्की ह्या केंद्रात घेऊन या आणि सुखद आठवणी सोबत घेऊन जा.
यशोगाथा - अभिषेक मळा कृषी पर्यटन केंद्र,पाकणी
Web: www.abhishekmala.com | Email: abhishekmala@gmail.com | Contact: 9850907958 / 9850908558
गेली 16/17 वर्षे आम्ही शेती मध्ये खुप पिकांची लागवड केली व उत्पादन केले आहे फळबागापासुन ते भाजीपाला पिकापर्यंत पिके होती.परंतु मागील म्हणजे 2000 ते 2001 पासुन पाऊस कमी मजुरांचा प्रश्न फार गंभीर होत गेला. त्यामुळे आम्ही सन 2003-2004 पासुन शेतीला जोड व्यवसाय करण्याचे ठरविले
तरी त्यानुसार 2003पासुन प्रथम आम्ही आमच्या शेती मध्ये हुरडा पार्टीची व्यवस्था करण्यास सुरुवात केली म्हणजे “कृषी पर्यटनाची सुरूवात केली”
त्याप्रमाणे आम्ही नंतर हळूहळू झोका घसरगुंडी हाॅलीबाॅल मैदान इतर सर्व गोष्टी केल्या व शेतात येतील त्या लोकांना काय लागते व कशाची गरज आहे हे पाहून विश्रांती साठी शेड व छप्पर घालणे,शेड बांधने,हे सर्व केले .
मुख्य उद्देश हा की शेती पारंपारिक केली असता आम्हाला दोन वेळेस पैसा यायचा उसाचा व ज्वारीचा आता कृषी पर्यटन हा शेती पुरक व्यवसाय केला असता आमच्या घरी हुरडा पार्टी माध्यमातून व बारमाही जेवण व इतर कार्यक्रमा अंतर्गत 100 ते 125 दिवस पैशांची आवक होत आहे तरी यातुन येतील त्या पैशातून आमच्या शेती चा विकास साधत आहोत. तसेच हुरडा पार्टी 3 महिने झाल्याव वाढदिवस,चोळी, साखरपुडा,लग्न, असे अनेक कार्यक्रम करत असतो या सर्व कार्यक्रमांना व हुरडा पार्टी ला माझ्या सर्व कुटुंबाची म्हणजे मुलगा,भाऊ, पुतण्या, इ. घरची सर्व मंडळी यात एकत्र काम करीत आहोत ..
त्यामुळे आमच्यासह गावातील 50 लोकांना रोजगार उपलब्ध झाला तसेच आम्ही सन 2007 पासुन “अंजली महिला बचत गट स्थापन केला आहे तरी त्या अंतर्गत शेंगाची चटणी, सांडगे,तळलेली मिरची,काळा मसाला,इ. वस्तू आम्ही तयार करतो व त्या वस्तू सोलापूर मध्ये साई सुपर मार्केट मध्ये व इतर आलेल्या पर्यटकांना त्याचा योग्य मोबदला घेऊन विकतो..
आमचे हे कार्य सुरु असताना आम्हाला येथे कृषी पर्यटन संस्था असल्याचे समजले व या संस्थेचे एम.डी. पांडुरंग तावरे यांच्या कडून आम्हाला बहुमोल मार्गदर्शन लाभले आम्ही त्या संस्थेचे सभासद आहोत
त्यानंतर या संस्थेने आम्हाला
1- जागतिक कृषी पर्यटन दिनानिमित्त सन 2009 ला जागतिक कृषी पर्यटन गौरव व मानपत्र देऊन सन्मानित करण्यात आले
2- भारतीय कृषक समाज दिल्ली कृषीरत्न डाॅ. पंजाबराव देशमुख स्मृती कृषी पुरस्कार दि- 26 डिसेंबर 2010 रोजी मानपत्र देऊन सन्मानित करण्यात आले
3- कृषी गौरव पुरस्कार दिव्य मराठी वृत्तपत्रांकडून मिळाला
4- राष्ट्रधर्मपुजक श्री दादाराव कराड राज्यस्तरीय कृषी रत्न पुरस्कार दि- 2 सप्टेंबर 2014 रोजी उप. पंतप्रधान मा.श्री लालकृष्ण अडवाणी यांच्या हस्ते मिळाला
5- गरूडझेप दादाराव बोडके यांच्या कडून मानचिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले
6- स्किल क्राफ्टर्स ट्रेनिंग इंन्सुटुट सोलापूर यांच्या तर्फे स्थानिक उद्योजक हा पुरस्कार 2018 मध्ये मिळाला.
7- कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा (आत्मा) अंतर्गत सन 2019 मध्ये नावीन्यपूर्ण कृषी पर्यटन केंद्र ह्या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले..
श्री.राजू पांडुरंग भंडारकवठेकर
( Mo:9850907958)
श्री. अभिषेक राजू भंडारकवठेकर
( Mo:9850908558)